मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीरं झालं जी’ फेम जिजी म्हणजेच, ज्येष्ठ अभिनेत्री ‘कमल ठोके’ यांचे शनिवारी निधन झाले आहे. जीजी यांचे निधन झाल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कलाकारांनी कमल ठोके यांना श्रद्धांजीली वाहिली आहे.
View this post on Instagram
कमल ठोके यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर कराड येथिल मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कमल ठोके मुलगा सुनिल याच्याकडे बंगळुरू येथे राहण्यास गेल्या होत्या आणि तिकडेच त्यांना देवाज्ञा झाली.
1992 मध्ये कमल यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मूळच्या शिक्षकी पेशाच्या कमल ठोके निवृत्तीनंतर पुन्हा कलाक्षेत्राकडे वळल्या होत्या. काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय साकारला होता. सध्या त्या ‘देवमाणूस’ मालिकेतही काम करत होत्या. मात्र काही महिन्यांपासून त्यांची कर्करोगासोबतची झुंज सुरू होती.