अधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांवर खोटा गुन्हा

दिलीप सातपुते : लोकप्रतिनिधींच्या आकसापोटी शिवसैनिक टार्गेट

नगर – नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले. हे काम पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने काल आंदोलन करण्यात आले होते. परंतू स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आकसापोटी संबंधित अधिकाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्यावरून शिवसैनिकांवर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी नगरसेवक योगिराज गाडे, भगवान फुलसौंदर, गणेश कवडे, गणेश शेंडगे आदी उपस्थित होते.

यावेळी सातपुते म्हणाले की, नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव येथील लोकप्रतिनिधींच्या आकसापोटी चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे गेल्या 8 महिन्यापासून काम रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यात खडी टाकून काम अर्धवट ठेवले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चालनेही मुश्‍किल झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला वेळोवेळी कळविले. परंतू अधिकारी व ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा राग येवून कालचा प्रकार घडला आहे.

तसेच सरकारी कामात अडथळा तेव्हा येतो की त्या कामासा विरोध केला असता. परंतू या नागरिकांनी रस्त्याचे काम करा, म्हणून आंदोलन केले आहे. त्यामुळे कामात अडथळा आणण्याचा प्रश्‍न येतोच कुठे संबंधितांनी दबावाखाली येवून खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने नगर शहरातील अनेक मोठ- मोठे कामे घेतली आहेत. ही कामे अर्धवट ठेवली आहेत. त्यामुळे त्याच्या घरासमोरही दहा ते 15 दिवसाने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सातपुते यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.