शेअरबाजार निर्देशांकांत झाली अल्प घसरण

मुंबई: निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आणि जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यामुळे भारतीय शेअरबाजारातही खरेदी-विक्रीच्या लाटा आल्यानंतर दिवसाअखेर मुख्य निर्देशांकात अल्प घसरण झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सन्सेक्‍स 50 अंकांनी म्हणजे 0.13 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 38,981 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 23 अंकांनी म्हणजे 0.20 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 11,724 अंकावर बंद झाला. जेट एअरवेजचा शेअर 12
टक्‍क्‍यांनी कोसळला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.