‘भारत’ चित्रपटाच्या कमाईत घसरण

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना यांचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली होती. परंतु प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘भारत’ चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ४२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र, दुसऱ्यादिवशी चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईत तब्ब्ल ११.३० कोटींची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भारत’ अग्रस्थानी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.