नवी दिल्ली- जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात बुधवारी सोन्याचा दर 231 रुपयांनी कमी होऊन 50,646 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 287 रुपयांनी कमी होऊन 60,929 रुपये प्रति किलो झाला. या संबंधात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे.
त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. सध्या डॉलर वधारत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. जागतिक बाजारात मात्र सोन्याचा दर वाढून 1,850 डॉलर व चांदीचा दर 21.69 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.