माढ्याच्या निकालानंतर फलटणला जल्लोष

फलटण – माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजय मिळवताच फलटण तालुक्‍यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची प्रचंड उधळण करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली. माढा बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयी पताका फडकवीत विजयश्री खेचून आणली आहे.

राज्याचे लक्ष वेधुन घेतलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयी मिळवत या मतदारसंघावर प्रथमत:च भाजपाचा झेंडा रोवला. रणजितसिंहाच्या विजयाचे वृत्त समजताच फलटणमध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्‍यांची मोठी आतिषबाजी केली व पेढे, जिलेबी, व लाडू वाटून आनंद व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघ हा राज्यात न्हवे तर देशात विविध कारणाने चर्चेत होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पुन्हा माढ्यातुन उभे राहण्याची केलेली घोषणा आणि फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ व केलेल्या विरोधानंतर घेतलेली माघार यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. तर शरद पवार यांनी माघार घेतल्याने राष्ट्रीय कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी “निवडणूक आली की फक्त कॉंग्रेस अथवा त्यांचे कार्यकर्ते दिसतात मात्र त्याच कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीत दुजाभाव केला जात असल्याचा थेट बॉम्ब टाकला आणि आम्ही आघाडीचा धर्म पाळणार नाही असे सांगून टाकत भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली.

यामुळे थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत विरोध करायचा असा पवित्रा घेत कधी माढ्यात तर कधी बोराटवाडी मध्ये भेटत चांगली फळी निर्माण केली होती. त्यावेळी मात्र हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतील, असा विचार ही केला नसेल दोघांना मात्र पुढे सर्व चित्र स्पष्ट झाले आणि दोघा मित्रांमध्ये होणारा सामना अटीतटीचा आणि चुरशीचा झाला. रणजितसिंह हे विजयाचे समीप पोहचताच कार्यकत्यांनी गुलालाची प्रचंड उधळण करत फटाक्‍याची आतिषबाजी केली. सोबत रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या जोरदार विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.