बनावट डेबिट कार्ड बनवून तिघांची फसवणूक

पिंपरी  – नकली डेबिट कार्ड तयार करुन तीन जणांच्या बॅंक खात्यातून एटीएमद्वारे 4 लाख 20 हजार रुपये काढून फसवूणक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्‍कम 29 सप्टेबर 2018 ते 1 जुलै 2019 या कालावधीत चिंचवड आणि दिल्लीमधील विविध बॅंकेच्या एटीएममधून काढण्यात आली आहे. याप्रकरणात प्रमोद नामदेवराव ढेंगरे (वय-53, रा. बिग बाझारजवळ, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड येथील एसबीआय बॅंकेचे ग्राहक असलेल्या फिर्यादी प्रमोद नामदेवराव ढेंगरे, अश्‍विन अमोलक दुगड, सुभाष ज्ञानोबा पडवळ यांच्या बॅंक खात्याचे अज्ञात आरोपीने बनावट एटीएम कार्ड तयार केले. सप्टेबर 2018 ते 1 जुलै 2019 या कालावधीत आरोपीने विविध एटीएममधून तसेच दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने प्रमोद ढेंगरे यांच्या खात्यावरील 1 लाख 60 हजार, अश्‍विन दुगड यांच्या खात्यावरील 1 लाख 60 हजार व सुभाष पडवळ यांच्या खात्यावरील 1 लाख रुपयाचे असे एकूण 4 लाख 20 हजार रुपये काढून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.