Kartik Kansal | ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळवल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. यावरून UPSC परीक्षांबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच आता चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील कार्तिक कंसल यांना कोणत्याही सेवेत नियुक्ती मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कार्तिक कंसल हे इस्रोमध्ये सायंटिस्ट आहेत.
वयाच्या १४ व्या वर्षापासून व्हीलचेअरवर
कार्तिक कंसल हे डिसॅबिलिटीच्या PwBD-1 श्रेणीत येतात. ते मुळचे उत्तराखंडमधील रुडकी येथील आहेत. कार्तिक यांना मस्कुलर डिस्ट्रॉफीचा त्रास आहे. या आजारात काळानुसार स्नायू कमकुवत होऊ लागतात. ते वयाच्या १४ व्या वर्षापासून व्हीलचेअरवर आहे.
कार्तिक यांनी आतापर्यंत एकूण सहा वेळा यूपीएससी परीक्षेला बसला आहे. यापैकी त्यांना चार वेळा यश मिळाले आहे. 2019 मध्ये त्यांची रँक 813 होती, जी 2021 मध्ये वाढून 271 झाली. ही त्याची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यानंतर UPSC-2022 मध्ये 784 आणि UPSC-2023 मध्ये 829 गुण होते.
कार्तिक कंसल यांना 2019 मध्ये लोकोमोटर डिसॅबिलिटी अंतर्गत 15 जागा रिक्त होत्या, त्यांपैकी 14 पदे भरण्यात आली. यानंतर 2021 मध्ये लोकोमोटर अपंगत्व श्रेणीतील 7 पैकी केवळ 4 पदे भरण्यात आली. या कॅटेगिरीमध्ये कार्तिक कंसल पहिल्या क्रमांकावर होते. मात्र तरीही त्यांची निवड झाली नाही. 2021 मध्ये त्याचा रँक सर्वोत्कृष्ट आणि IAS पदासाठीही पात्र होता, मात्र तेव्हा UPSC ने IAS साठी पात्र उमेदवारांच्या सेवा शर्तींत मस्क्यूलर डिस्ट्रॉफीचा समावेश केला नाही.
कार्तिक कंसल यांचे शिक्षण
कार्तिक कंसल यांनी आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. ते सध्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. ऑल इंडिया सेंट्रल रिक्रूटमेंटच्या माध्यमाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत त्यांची निवड झाली आहे.
कार्तिक यांची केस CAT मध्ये लढत
कार्तिक सध्या सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये (कॅट) खटला लढवत आहे. 2021 पासूनच्या त्याच्या UPSC निकालाच्या आधारे हे प्रकरण CAT मध्ये प्रलंबित आहे. 2021 च्या UPSC अधिसूचनेनुसार, अपंगत्वाचे निकष दोन गोष्टींवर आधारित आहेत – कार्यात्मक वर्गीकरण आणि शारीरिक आवश्यकता. कार्तिकला डीओपीटीकडून सांगण्यात आले की त्याचे कार्यात्मक वर्गीकरण आणि भौतिक गरजा त्याने ज्या सेवेसाठी अर्ज केला होता त्या आवश्यकतेनुसार नाहीत.
संधी न मिळणे हे निराशाजनक
कार्तिकच्या दृष्टीकोनातून हे खूपच निराशाजनक आहे, ज्याने अपंगत्व असूनही चार वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि सेवेसाठी जवळजवळ सर्व अपंगत्व निकष पूर्ण केले आहेत. मात्र तरीही त्यांना सेवेची संधी देण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
फडणवीसांनी सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला : चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा