पणजी – महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, असे विधान भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
प्रमोद सावंत म्हणाले, महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत, असे त्यांनी सांगितले.