पोलिसांकडून महिलांना नाचवण्याच्या घटनेमुळं फडणवीस संतापले; म्हणाले…

मुंबई : राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून जनतेचे रक्षकच भक्षक बनल्याचे समोर आले आहे. जळगावमध्ये सरकारी वसतिगृहातील महिला आणि मुलींवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वसतीगृहातील या महिलांना आणि मुलींना कपडे काढून नाचवण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस संतप्त झाले आहे.

जळगावमधील घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार संवेदनशील नसल्याचं म्हटलंय. जळगावमधील घटनेचा उल्लेख करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला.

दरम्यान मुनगंटीवारांच्या मागणीत काही गैर नाही, कारण संदर्भातील घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. केवळ एखादी बातमी असती तर गोष्ट वेगळी होती. पण, त्या मुलीला नग्न करुन पोलीस नाचवत आहेत. त्यामुळे, आपण संवेदनशीलतने तात्काळ कारवाई करावी, यासाठी ही तळमळ असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.