मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी (गुरुवारी) शपथ घेतली. शिंदे यांनी सेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे या मागणीसह बंड पुकारले होते. त्यांच्या या बंडाला ३९ सेना आमदारांनी पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांना त्यांचे बंड मोडून काढण्यात सपशेल अपयश आल्याने अखेर बुधवारी रात्री ९.३० वाजता त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करतील हे स्पष्ट होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असल्याची घोषणा करत एकच खळबळ उडवून दिली.अनपेक्षितरित्या मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात पडली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचे स्मरण केले. शिंदे हे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री ठरले. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे तर सोशलवर फडणवीस नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधीनंतर आपल्या ट्विटर, फेसबुकचे प्रोफाईल लगेच बदलले. पण अजूनही फडणवीस यांच्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शपथविधीच्या वेळी फडणवीस नाराज होते. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सर्वत्र