मुंबई : राज्यातील सध्याची परिस्थिती ही शिंदे गट आणि भाजप विरुद्ध शिवसेना अशीच झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच सध्या मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्ता मेळावाआयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
मेळाव्यात बोलताना शेलार यांनी, “फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमात टोल, रस्ते, खड्डे आणि विकास कामांवरुन शेलारांनी शिवसेनेवर टीका केली.
मुंबई अध्यक्षपदावरुन झालेल्या टीकेला देखील शेलारांनी या कार्यक्रमात उत्तर दिले आहे. मुंबईतील समस्यांची जाण असल्यानेच अध्यक्षपदी निवड झाल्याचे शेलार यावेळी म्हणाले. शिवसेनेने मुंबईला भ्रष्टाचार दिला, असा घणाघातही शेलार यांनी यावेळी केला.