मामू फडणवीस लाभार्थींना बदनाम करत आहेत- धनंजय मुंडे

डिजिटल गावातील तरूणाला गाव सोडून जाण्याची वेळ 

मुंबई: भाजप सरकारने डिजिटल गावांच्या जाहिराती केल्या. त्यामध्ये अनेक युवकांचा सुद्धा उपयोग करून घेतला. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल गाव ठरल्याचा दावा भाजपने वेळोवेळी केला. आणि याच जाहिरातीची पोल-खोल राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत पुराव्यासहित केली होती. दरम्यान, हरिसाल गावातील मी सुद्धा लाभार्थीं म्हणणाऱ्या मनोहर खडके वर गाव सोडायची वेळ आली आहे.

विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “अरेरेरेरेरे… देशातील पहिल्या ‘फसव्या’ डिजिटल गावातील लाभार्थी तरूणाला गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. तिकडे परमपूज्य मोदी चौकीदारांना बदनाम करत फिरत आहेत. इथे मामू फडणवीस लाभार्थींना बदनाम करत आहेत. कैसा सिला दिया? सबकुछ भूला दिया…” अशी मिश्किल टिपण्णी मुंडेंनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.