मुंबई: महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रीपद ते पालकमंत्री पदाचा दावा सांगण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेत होत असल्याचे दिसून आले होते. परिमाणी एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यावर नाराजहून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ दरे या गावी गेल्याचे पाहिला मिळाले. मात्र, आता फडणवीस आणि अजित पवारांमध्ये जवळीक निर्माण झाल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाच दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा होत आहे.
एकनाथ शिंदेंनी प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वॅाररुमच्या धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को अॅार्डिनेशन रुमची स्थापन केली आहे. यामुळे शिंदेंनी उचलेले हे पाऊल फडणवीसांना शह असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदेंची बैठकांना दांडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बहुतांशी बैठकांना एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे. स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे गैरहजर असल्याने एकनाथ शिंदे हे फडणवीसांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांनी बोलावलेली 100 दिवसांच्या आढावा बैठकीला देखील शिंदे उपस्थित नव्हते. यामुळे पुन्हा एकदा शिंदे हे फडणवीसांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा केली जात आहे.
समातंर सत्ताकेंद्र चालणार
राज्याचे मुख्यमंत्री विविध प्रकल्पांचा आढावा वॅार रुमच्या माध्यमातून घेत असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाळी संबंधित विभागांचे अधिकारी, मंत्री बैठकीला हजर राहून माहिती देत असतात. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच धर्तीवर त्यांच्या पक्षाकडे असलेल्या खात्यांची स्वंतत्र बैठक घेण्यासाठी को-अॅार्डिनेशन रुमची निर्मिती केली आहे. ही वॅार रुम मुख्यमंत्र्यांच्याही वॅार रुमला शह देणारी असेल असे बोलले जात आहे. परिणामी समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते, असे सुद्धा सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा को-ऑर्डिनेशन रुममधून एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत.