फडणवीस १०० आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही? प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. त्यामुळे भाजप नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले नाही. त्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

त्यामुळे सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागलं. फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं शंभरपार मजल मारली. मात्र शिवसेनेला आतापर्यंत कधीही ८० च्या पुढे जाता आलेलं नाही. यामागचं कारण काय, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. 

दरम्यान, मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत याना प्रश्न विचारला की,  देवेंद्र फडणवीस यांनी शंभरहून अधिक जागा जिंकून दाखवल्या. पण बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेला हा करिश्मा करून का दाखवता आला नाही? असा प्रश्न विचारण्यात आला.  

यावर संजय राऊत म्हणाले,‘सत्ता येत जात करते दहा वीस जागा जिंकून म्हणून कुठला पक्ष मोठा होत नसतो. शिवसेना पक्ष बराच वर्ष विरोधी पक्ष म्हणून राज्यात राहिला तरीही आज तो टिकला आहे.  विरोधी पक्षात असतांना कुणाला वाटलं नव्हतं मुंबई-ठाण्याची वेस ओलांडेल .  मात्र आज महाराष्ट्रभर पोहोचलो आणि ५५ वर्षे टिकलो’ असं म्हणत त्यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.