पाच वर्षात तब्बल १५ कोटी ५१ लाख रुपये टिव्ही व रेडीओ जाहिरातींवर खर्च
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्र जाहिरात खर्च वगळता फक्त टिव्ही व रिडीओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला तब्बल ८५ हजार रुपये शासकीय तिजोरीतुन खर्च केल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातुन उघडकीस आली आहे. बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती.