नेवासे (प्रतिनिधी) – राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्वाखालील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. 21 जागांसाठी 138 जणांनी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 117 जणांनी अर्ज मागे घेतली. त्यामुळे 21 जागांसाठी 21 अर्जच शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
करोनाकाळात या कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकाने टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू केले. त्यानंतर विविध संस्थांच्या निवडणुका घेण्यासही परवानगी दिली. त्यानुसार मुळा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आले.
त्यानुसार अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 138 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारीच्या दिवशी 117 जणांनी अर्ज मागे घेतली. त्यामुळे 21 जागांसाठी 21 अर्जच राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
मतदारसंघ व बिनविरोध निवडणू आलेले संचालक असे ः
ऊस उत्पादक सभासद मतदारसंघ- सोनई गट- शंकरराव यशवंतराव गडाख, कारभारी काशिनाथ ढफळ, घोडेगाव गट- बाबूराव ज्ञानदेव चौधरी, लक्ष्मण तुळशिराम पांढरे,
खरवंडी गट- भाऊसाहेब निवृत्ती मोटे, बापूसाहेब शंकर शेटे, करजगाव गट- संजय पोपटराव जंगले, बबन पुंजाजी दरंदले, दामोदर दशरथ टेमक, नेवासे गट- नीलेश विठ्ठलराव पाटील, नारायण सूर्यभान लोखंडे, बाबासाहेब शिवाजी भणगे, प्रवरासंगम गट- बाळासाहेब दादा पाटील, बाळासाहेब आसाराम गोरे, कडुबाळ बाबूराव कर्डिले.
सहकारी संस्था मतदार संघ- नानासाहेब काशिनाथ तुवर, अनु. जाती-जमाती मतदारसंघ- कडुबाळ कचरु गायकवाड, महिला प्रतिनिधी- ताराबाई सुखदेव पंडित, अलका रंगनाथ जंगले, इतर मागासवर्ग मतदारसंघ- बाळासाहेब एकनाथ बनकर, भटके विमुक्त जाती-जमाती-बाळासाहेब भाऊलाल परदेशी.
जलसंधारणमंत्री गडाखांच्या प्रयत्नानंतर मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व ना. गडाख यांनी नूतन संचालकांचे अभिनंदन केले आहे.