-->

एक फेब्रुवारीपासून पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी फेसरीडींग सुरू

  • विभागप्रमुखांना आयुक्तांच्या सूचना : रजिस्ट्रेशन 30 जानेवारीच्या आत पूर्ण करून घेण्याचे आदेश

पिंपरी – करोना संक्रमणामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमधून सूट देण्यात आली होती. शहरामध्ये आता करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 1 फेब्रुवारीपासून थम्ब इम्प्रेशनऐवजी फेस रीडिंग मशीनद्वारे बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक व सक्तीचे करण्यात येणार आहे. तसे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

महापालिका आस्थापनेवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फेस रींडिंग रजिस्ट्रेशन 30 जानेवारीच्या आत पूर्ण करून घेण्याचे आदेश आयुक्तांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल 30 जानेवारीपर्यंत प्रशासन विभागाकडे सादर करावा. रजिस्ट्रेशन माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर करावे. रजिस्ट्रेशन न केल्यास किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याचे आढळून आल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे.

ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वेगवेगळ्या कार्यालयाचे पदभार असल्यास त्यांना कार्यरत आस्थापना विभागाच्या अतिरिक्त अन्य ठिकाणी फेस रीडिंग रजिस्ट्रेशन विभागप्रमुखांच्या शिफारसपत्राशिवाय केले जाऊ नये असे आदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.