फेसबुकला होणार तब्बल 5 अब्ज डॉलरचा दंड

नवी दिल्ली – फेसबुक या कंपनीला तब्बल 5 अब्ज डॉलरचा म्हणजे साधारणपणे 35 हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हा तंत्रज्ञान कंपनीला होणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठरणार आहे. या अगोदर 2012 मध्ये गुगल कंपनीला 22 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. फेसबुकने दंड भरण्याची मानसिक तयारी केलेली आहे. फेसबुकचा महसूल आणि नफा पाहता फेसबुकला हा दंड देणे फारसे अवघड जाणार नाही. मात्र फेसबुकवर इतर निर्बंध येण्याची शक्‍यता आहे.

अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनमध्ये या विषयावर मतदान झाले असून मताधिक्‍याने हा दंड ठोठावला जाण्याची शक्‍यता आहे. फेसबुक यासंदर्भात उच्च न्यायालयात अपील करण्याची शक्‍यता असली तरीही न्यायालय दंडाच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करणार असल्याचे बोलले जात आहे. फेसबुक च्या व्यासपीठावर जगातील 2 अब्ज लोक संवाद साधतात. त्याचबरोबर आता फेसबुकने डिजिटल करन्सी सुरू करण्याचे ठरविले आहे. या विषयावर फेसबुकच्या प्रशासनात चर्चा झाली असून दंडासाठी तरतूदही करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)