फेसबुक करणार तज्ञ पत्रकारांची नियुक्ती

अमेरिकेत वर्तमानपत्रांवर आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय
वॉशिंग्टन: अमेरिकेत वर्तमानपत्रांवर आलेल्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आता फेसबुकने तज्ज्ञ पत्रकारांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा संकटग्रस्त वर्तमानपत्र माध्यमांना फायदा होण्याची शक्‍यता नसल्याचेही समजते.
फेसबुकने याबाबत माहिती दिली आहे.

फेसबूकतर्फे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्या निवडण्यासाठी पत्रकारांची एक छोटी टीम बनवली जाणार आहे. ज्यामुळे हे निश्‍चित करण्यात येईल की, फेसबूक योग्य बातम्या समाजासमोर आणत आहे अथवा बातम्या फेक आहेत. त्यानुसार आता बातम्या या पारंपरिक न्यूज फिड ऐवजी न्यूज टैब या सेक्‍शनमध्ये दिसतील. फेसबुकने निवड केलेले पत्रकार बातम्या या संकेतस्थळावरुन निवडतील. मात्र, ते त्या बातम्यांमध्ये बदल करणार नाहीत, असेही फेसबुकने स्पष्ट केले.

फेसबुकने जानेवारीमध्ये घोषणा केली होती की, ते पत्रकारितामध्ये सहयोगासाठी विशेष करुन स्थानिक वर्तमानपत्र संस्थांसाठी येणाऱ्या तीन वर्षांमध्ये 3000 लाख अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेमध्ये बातम्यांचा प्रचार आणि प्रसार समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावासमोर वर्तमानपत्रे संकटाचा सामना करत आहे. यामुळेच मागील 15 वर्षांमध्ये 2000 वर्तमानपत्र बंद पडली आहेत. त्यामुळे लोकांना स्थानिक बातम्यांची माहिती मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षी जाहीर केलेल्या प्यू संशोधन केंद्राच्या सर्वेनुसार, 2008 ते 2018 पर्यंत अमेरिकेतील वर्तमानत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या 47 टक्के कमी झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)