..तब्बल 9 तास बंद होते फेसबूक, व्हॉट्‌सऍप आणि इंस्टाग्राम

पुणे – जगभरात फेसबूक, व्हॉट्‌सऍप आणि इंस्टाग्राम बुधवारी अचानक बंद पडले होते. या सर्वच सोशल साईट्‌सवर फोटो उपलोड करायला आणि पहायला त्रास जानवत असल्याच्या तक्रारी अनेक युजर्सनी केल्या होत्या. या सर्वच सोशल मीडिया कंपन्यांना सेवा पूर्ववत करण्यासाठी 9 तासांचा वेळ लागला.

या संदर्भात फेसबूकच्या अधिकृत अकाऊंटवरून गुरुवारी सकाळी 5.36 वाजता ट्विट करून या वृत्तास अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. त्या ट्विटमध्ये फेसबूक ने म्हणले आहे की, आमच्या अनेक यूजर्सला फोटो आणि व्हिडिओ अपलोड करताना समस्या येत आहेत. आता ती समस्या दूर करण्यात आली आहे. या असुविधेबद्दल सोशल मीडियाने दिलगिरकी देखील व्यक्त केली आहे.

यावेळी या तिनही महत्वपूर्ण सोशल साईट्‌स डाऊन असल्याचा फटका जगभरातील 4 अब्ज 4 कोटी लोकांना बसला. या दरम्यान ट्विटर मात्र सुरळीत सुरू होते. त्यामुळे, बहुतांश लोकांनी ट्विट करून आपल्या समस्या मांडल्या. अनेकांनी त्यावर स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केले होते. यात यूजर्सला फेसबूकच्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर अपलोडिंगच्या तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात फेसबूकच्या व्यवस्थापनाने बुधवारी रात्री पावणे दहा वाजता ट्विट करून आपल्याला या समस्येची माहिती मिळाली असून लवकरच दुरुस्त केले जाईल असे सांगितले होते. त्यानंतर ही समस्या दूर करण्यासाठी त्यांना 9 तास लागले आहेत.

अशाच प्रकारची घटना 19 एप्रिल रोजी सुद्धा घडली होती.फेसबूक, व्हॉट्‌सऍप आणि इंस्टाग्राम या फेसबूकच्याच कंपन्या आहेत. सोशल मीडिया वापरताना येणाऱ्या अडचणींची 75 लाख लोकांनी तक्रार केली होती

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.