मुंबई- सध्या आपण सगळेच फेसबुकचा वापर करत आहोत. लाॅकडाऊनमुळे फेसबुक वापरण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. सगळ्यांनी फेसबुकचा एका प्लॅटफाॅर्मसारखा वापर केला. आपल्या कला यावर अपलोडकरुन अनेकांनी प्रसिद्धी सुद्धा मिळवली. रोज अनेक व्हीडियो या मार्फत व्हायरल होतात. मात्र यासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
सोशल मीडिया Social Media प्लॅटफॉर्म आपल्या चांगल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पाडत असल्याचं एका अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. ‘द इंडिपेंडेंट’च्या रिपोर्टनुसार, हा अभ्यास दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.
या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. युजर्सचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थही अभ्यासलं असल्याचं संशोधकांनी सांगितलं. स्टेटस अपडेट करणं, एखाद्या लिंकवर क्लिक करणं, लिहिणं यासारख्या गोष्टींमुळे पाच ते आठ टक्के लोक मानसिक कमतरतेशी निगडित होते.