तरुणीवर बारामतीत पहिला गुन्हा दाखल
बारामती (प्रतिनिधी ) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा वैभव सोलनकर यांनी दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन फेसबुक पोस्ट करणाऱ्यावर बारामती पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभाविपचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दिली आहे. पुजा झोळ या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे वैभव सोलनकर यांनी म्हटले आहे. यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम ५०५ (२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा तर लोकशाहीचा अतिरेक झाला आहे. पोस्ट करणारी महिला असून माजी महिला मुख्यमंत्र्यावरती असे स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे.
– वैभव सोलनकर (अभाविपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य)