मुंबई- लाॅकडाऊनमुळे अनेकांनी अनेक नवनवीन अॅप मार्फत जीवनशैली बदलली. झुम, गुगल मीट च्या माध्यामांमधून एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यातच काही जुन्या असलेले सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म्सने देखील नवीन गोष्टींचा समावेश करत लाँच केले. तसेच फेसबुकने सुद्धा रुम क्रिएट हे फिचर लाँच केलं होतं. आता त्यात अजून भर पडली आहे.
आता Facebook ने आपल्या युजर्ससाठी नवं फिचर जारी केलं आहे. कंपनीने नुकताच आपल्या युजर्ससाठी वॉच टुगेदर (Watch Together) हे नवीन फिचर बाजारात आणलं आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स दूर असलेल्या मित्रांसह व्हिडिओ पाहू शकतात.
‘वॉच टुगेदर’ या फिचरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला मेसेंजर व्हिडिओ सुरू करावा लागेल. त्यानंतर मेसेंजर रूम क्रिएट करा. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेन्यूमध्ये जावं लागेल आणि त्याठिकाणी
तुम्ही तुमच्या मित्रांसह किंवा कुटुंबासह नवीन कटेंट पाहू इच्छीत असाल तर वेग-वेगळ्या प्रकारांमधील कंटेंट निवडू शकता. त्याचप्रमाणे सर्च ऑप्शनमध्ये जावून तुम्ही तुमच्या आवडतीचं कंटेंट सर्च करू शकता. मेसेंजर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका वेळेस 8 जण एकत्र व्हिडिओ पाहू शकतात. तर मेसेंजर रूमच्या माध्यमातून एका वेळेस 50 जण व्हिडिओ कॉल कनेक्ट करू शकतात.