मुंबई – लोकप्रिय सोशल माध्यमे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप जगभरात काही काळ डाऊन झाली आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे या माध्यमांची सेवा बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. कॉम्पुटर वर फेसबुक वापरकर्त्यांना यामुळे आपले अकाऊंट चालू करण्यासाठी अडचणी येत आहेत.
तर इन्स्टाग्राम, व्हाट्सअप या माध्यमांची सेवा देखील दिरंगाईने सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. फेसबुक अकाऊंट वर गेले असता ‘This site can`t be reached’, असा संदेश दिला जात असल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे.
मागच्या वेळी देखील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप यांची सेवा काही काळ स्थगित झाली होती. त्यानंतर फेसबुकने सर्व्हर मध्ये झालेल्या अडचणीमुळे अशा प्रकारचा व्यत्यय आल्याचे स्पष्टीकरण दिले होते.