रिझाइन मोदी संदर्भात फेसबुकने चूक केली मान्य !

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा हॅशटॅग ट्रेंड होत होता

नवी दिल्ली : करोनाच्या मुद्द्यावरून काही नेटकरी सोशल मीडियावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा भडिमार करत आहेत. याच संदर्भात फेसबुकवरही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा हॅशटॅग ट्रेंड होत होता, पण फेसबुकने हा हॅशटॅगच नंतर ब्लॉक केला. यावरून टीका होण्यास सुरुवात होताच फेसबुकने चूक मान्य केली आणि हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला आहे.

फेसबुकवर बुधवारी नेटकऱ्यांकडून रिझाइन मोदी हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. तो फेसबुककडून ब्लॉक करण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी हॅशटॅग ब्लॉक केल्यावरून ट्‌विटरवरून तक्रार करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर काहींनी हा लोकशाहीला धोका असल्याचेही म्हटले. त्यानंतर फेसबुकने काही तासांनी चूक मान्य करत हॅशटॅग पूर्ववत केला.

दरम्यान, फेसबुकच्या प्रवक्‍त्याकडून आमच्याकडून चुकून तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, आम्हाला त्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती. आता हॅशटॅग पूर्ववत झाला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

फेसबुककडून वेगवेगळ्या कारणांमुळे हॅशटॅग ब्लॉक केले जातात. काहीवेळेस मॅन्युअली, पण ऑटोमॅटिक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित हॅशटॅग ब्लॉक होतात, लेबलशी संबंधित एरर आल्यामुळे तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, असे कंपनीच्या प्रवक्‍त्यांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.