F1 French GP 2021 : फ्रेंच ग्रांप्री व्हस्ट्रापेनने जिंकली

पॅरिस – बेल्जियमचा प्रसिद्ध एफ-1 ड्रायव्हर मॅक्‍स व्हस्ट्रापेनने यंदाच्या मोसमातील आणखी एक फॉर्म्युला शर्यत जिंकली. त्याने अंतिम फेरीत जागतिक स्टार लुइस हॅमिल्टनवर मात केली व फ्रेंच. ग्रां. प्री. फॉर्म्युला-1 शर्यतीचेही विजेतेपद पटकावले.

व्हस्ट्रापेनने या विजेतेपदासाठी हॅमिल्टनवरील आघाडी 12 गुणांनी वाढवली. त्याचे हे या मोसमातील तसेच कारकिर्दीतील तिसरे विजेतेपद ठरले. रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने तिसरे स्थान मिळवले.

बोट्टास आणि लॅंदो नोरिस यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. व्हस्ट्रापेन व्यावसायिक स्पर्धेत नवखा असला तरीही त्याने या शर्यतीत अनुभवी हॅमिल्टनला चांगलीच लढत दिली. यंदाच्या मोसमात त्याच्याकडून अशाच सरस कामगिरीची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.