सरकारकडून वारंवार रोजगाराच्या मुद्यांवर डोळेझाक

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा पुन्हा सरकारवर हल्ला

नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरणाऱ्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एका सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील सरकार वारंवार रोजगाराच्या मुद्यांवर पुर्णपणे डोळेझाक करते असा आरोप करत प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. तसेच ‘उत्तर प्रदेशात सुमारे 2 लाख शिक्षकांच्या पदे रिक्त आहेत. तरुण नोकऱ्या सोडण्याचा मार्ग शोधत आहेत असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

‘भाजपा सरकारचे लोक रोजगार देण्याच्या मुद्द्याकडे पाठ फिरवतात तसेच उत्तर भारतातील तरुणांमध्ये योग्यता नाही, असे सतत बोलत असतात असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी ते केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या टिप्पणीवर म्हणाले की, मंत्री महोदय, जर तुम्ही इतकी मोठी गोष्ट बोलली असेल तर आकडेवारीसुद्धा द्या, गेल्या वर्ष आणि 100 दिवसात तुम्ही किती नोकऱ्या दिल्या? गेल्या वर्षात किती उत्तर भारतीयांना नोकऱ्या दिल्या? स्किल इंडिया कार्यक्रमांतर्गत किती नोकऱ्या दिल्या? होय, लक्षात ठेवा, नोकऱ्याकडे जाण्यासाठी लोकांकडे डेटा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here