अमेरिकेत जन्म दरात कमालीची घट

वॉशिंग्टन – अमेरिकेत गेल्या सहा वर्षां पासून जन्म दरात कमालीची घट झाली असून यावर्षी गेल्या ११२ वर्षातील जन्म दराची नीचांकी नोंद झाली आहे. २०१९च्या तुलनेत यावर्षी जन्म दर ४ टक्के घसरला आहे.

सेंटर फॉरडिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेने आपल्या ताज्या अहवालात हि माहिती दिली आहे. गेल्या वर्षी जरी करण्यात आलेल्या ९९टक्के जन्म प्रमाण पत्रांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

अमेरिकेत सध्या दर १००० महिलां मागे ५६ ह्या जन्म दर आहे. अमेरिकेतील फर्टिलिटी दर ही २. १ टक्के वरून १.६ टक्के पर्यंत घसरला आहे.

या अहवाला प्रमाणे गेल्या वर्षी अमेरिकेत ३६ लाख मुलांचा जन्म झाला २०१९ मध्ये हा आकडा ३८ लाख होता. तर २००७ मध्ये हा आकडा ४३ लाख होता. अमेरिके शिवाय इतर काही युरोपीय देशांमध्ये ही अशी घसरण सुरु आहे. इटलीत गेल्या वर्षी प्रथमच जन्म दरात तब्बल २२टक्के घसरण झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.