कोंढवा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करू – चंद्रकांत पाटील

पुणे – हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.