नवी दिल्ली – प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, पुनीत राजकुमारला जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच अशाच प्रकारे बॉलिवूडचा तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचाही लहान वयात हृदयविकाराने मृत्यू झाला.
याआधी बुधवारी प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैजाद कपाडिया यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा दर्जा मानला जात असला तरी, अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की बॉलीवूड तारे आणि खूप फिटनेस-सजग असलेले सेलिब्रिटी हृदयविकाराच्या झटक्याला अधिक बळी पडत आहेत.
आधी सिद्धार्थ शुक्ला, कैझाद कपाडिया आणि आता पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे की फिटनेसची जास्त ओढ घातक ठरत आहे का?
फिटनेस फ्रीक कलाकार हृदयविकाराला का बळी पडतात?
फिटनेस फ्रिक कलाकारांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे की, जिमचे जास्त प्रेम जीवघेणे ठरत आहे का? याबाबत हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, जास्त जिम केल्याने हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो यात शंका नाही. शरीराच्या स्टॅमिना पेक्षा त्यावर जास्त दबाव टाकल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. परंतु केवळ व्यायाम हा घटक मानता येणार नाही. चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी आणि दारू-धूम्रपान, खाण्याच्या विकारांमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
‘ही’ मानसिक बाजूही समजून घ्या
मानसोपचार तज्ज्ञ्यांच्या मते फिटनेस प्रेमी कलाकारांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा झटका यासारख्या समस्यांची वाढ चिंताजनक आहे, परंतु यामागील मानसिक कारण देखील समजून घेणे आवश्यक आहे. बहुतेक अभिनेते आणि सेलिब्रिटी कामामुळे झोपू शकत नाहीत, त्यांना रात्रभर जागे राहून शूटिंग करावे लागते. यामुळे झोपेची पद्धत पूर्णपणे विस्कळीत होते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की झोपेची कमतरता किंवा झोपेच्या खराब पद्धतींमुळे केवळ हृदयविकाराचा धोका वाढतो असे नाही तर इतर अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार देखील वाढतात.
क्षमतेपेक्षा जास्त दबाव नको
राजधानी दिल्लीत जिम चालवणारा फिटनेस ट्रेनर लकी म्हणतो, चांगला फिटनेस आरोग्यासाठी जितका फायदेशीर मानला जातो तितकेच फिटनेसचे अति वेडही हानिकारक ठरू शकते. प्रशिक्षकांच्या मते जिममध्ये येणाऱ्या सर्व लोकांसाठी पहिला सल्ला हा आहे की तुम्ही तुमची क्षमता आणि ताकद समजून घ्या आणि त्या आधारे व्यायाम करा. शरीरावर क्षमतेपेक्षा जास्त दबाव टाकल्यास हृदयविकाराचा झटका, फ्रॅक्चर यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवावी.