करोनाच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल

वडगाव निंबाळकरमध्ये मायलेकराची आत्महत्या

बारामती- वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे सोमवारी (दि.28) सकाळी गावाशेजारील एका विहिरीत माय-लेकराचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुषमा प्रमोद लोणकर (वय 26) व वीर प्रमोद लोणकर (वय 1 वर्ष), अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. यासंबंधी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे. करोनाच्या भीतीने मायलेकराने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली आहे.

उपलब्ध माहितीनुसार लोणकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे मृत सुषमा यांनी माहेरी सोडा, असा आग्रह पतीकडे रविवारी (दि. 27) रात्री धरला होता. सोमवारी बघू असे उत्तर पतीने दिले होते. परंतु मानसिक ताण व भीतीपोटी महिलेने गावाशेजारील शिलाईचा मळा परिसरातील एका विहिरीत एक वर्षाच्या चिमुकल्यासह पहाटेच आत्महत्या केली. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शास ही बाब आल्यानंतर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.