पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- भारतातील विमानतळांवर अनेक प्रवाशांना हृदयविकाराच्या झटका येण्याच्या घटना वाढत आहेत. या वाढत्या घटना पाहता भारतातील सर्व विमानतळांवर जीवन रक्षक उपकरण बाह्य डिफिब्रिलेटर (Automated external defibrillators) उपलब्ध करण्यात यावे.
यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुणे विमानतळावर काही महिन्यांपूर्वी जीवन रक्षक उपकरण उपलब्ध करण्यात आले आहे.
हृदयविकारासारखी आपत्ती आल्यास त्या प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर (Automated external defibrillators) उपकरण महत्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, देशातील काही किरकोळ अपवाद वगळता बहुतांश विमानतळावर एईडी उपकरण नसल्याने अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक विमानताळवर हे जीवन रक्षक उपकरण (ऐईडी) उपलब्ध असणे आवश्यक आहे.
देशातील बहुतांश विमानतळावर आजही महत्वाची उपकरणे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना आपत्कालिन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नाही. हवाई वाहतूक क्षेत्रातील अनेकजण जीवन रक्षक उपकरण करुन देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. सध्या, स्थितीत दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ही सुविधा आहे. तर काही महिन्यांपूर्वी पुणे विमानतळावर एक जीवन रक्षक उपकरण देण्यात आले आहे.
भारतातील सर्व विमानतळांवर तसेच देशातील आणि भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये बाह्य डिफिब्रिलेटर उपलब्ध करण्यात यावे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. – धैर्यशिल वंडेकर, हवाइ वाहतूक तज्ज्ञ