#AirStrike : पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलवली

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकवर कारवाई करण्याची मागणी होत होती. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले आहेत.  या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. तसेच  परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून नोटीसही जारी करण्यात आलं आहे. देशातील लष्कर आणि सुरक्षा संबंधी राजधानी इस्लामाबाद येथे ही तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.