वढेरांना विदेशात जाण्यास अनुमती

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना येथील स्थानिक कोर्टाने विदेशात जाण्यास अनुमती दिली आहे.

वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कारणासाठी त्यांनी विदेशात जाण्याची अनुमती कोर्टाकडे मागितली होती. वढेरा यांच्यावर सध्या मनि लॉड्रिंग प्रकरणात कोर्टात खटला सुरू आहे. त्यामुळे त्यांना कोर्टाच्या अनुमतीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही.

वढेरा यांना दोन आठवड्यांसाठी स्पेनला जायचे आहे. कोर्टाने त्यांना आज ही अनुमती देताना कोर्टाकडे 25 लाख रूपयांची अनामत भरण्याची सुचना केली असून स्पेन मध्ये नेमके त्यांना कोठे जायचे आहे याचा पत्ता सादर करण्याची सुचनाहीं कोर्टाने केली आहे. रॉबर्ट वढेरा हे या प्रकरणात सध्या अटकपुर्व जामीनावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.