पुणे : खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी “पेरा’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 28 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि अग्री इंजिनिअरिंग या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन “पेरा’ सीईटीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही सीईटी दि. 30 जून, 1 जुलै आणि 2 जुलै 2022 दरम्यान ऑनलाइन प्रॉक्टर्डद्वारे घेतली जाणार आहे.
या सीईटीच्या ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जूनपर्यंत होती. ती आता 28 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती “पेरा’ इंडियाचे अध्यक्ष व एआयटी एटीडी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, “पेरा’चे उपाध्यक्ष भरत अग्रवाल आणि पेराचे सीईओ प्रा. हनुमंत पवार यांनी दिली.