निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली – निवृत्तीवेतन धारकांना आपल्या हयातीचा दाखला सादर करण्याच्या कालावधीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कोविडच्या परिस्थितीत, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने केंद्र सरकारने यावर्षी 31 डिसेंबर पर्यंत ही मुदत वाढवली आहे, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्‍टर जितेंद्र सिंग यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. 

या निर्णयानुसार 80 वर्षांच्या वर वयोमान असलेले निवृत्तीवेतनधारकांनी येत्या एक ऑक्‍टोबरपासून, तर इतर निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबर पासून आपल्या हयातीचे दाखले सादर करायचे आहेत.

31 डिसेंबर पर्यंत दाखले सादर करू न शकलेल्या निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्ती वेतन, या कालावधीत सुरूच राहील असेही जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.