अहिल्यानगर : धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी झालेल्या सर्व विश्वस्त संस्था / ट्रस्ट यांना सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षाचे ऑडिट रिपोर्ट www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यासाठी दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाची नमूद वेबसाइट तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थित व सुरळीत सुरू नसल्यामुळे विश्वस्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सदरची मुदत वाढविल्याचे परिपत्रकात नमूद केलेले आहे.
जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या सर्व ट्रस्टच्या विश्वस्तांनी याची नोंद घेत दि. 31/ डिसेंबरच्या आत संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्यास आपले हिशोबपत्रके जमा करावीत, असे आवाहन अॅड. संतोष गायकवाड यांनी केले आहे.