#video । स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी

पुणे – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील दावडी येथील महालक्ष्मी महिला बचत गटांच्या अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून ३८ धान्यांचे कट्टे दुकानात असलेल्या कामगारांच्या घरी ठेण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

नागरिकांना वाटप न करता हे धान्य काळ्या बाजाराने विकले जात असल्याची कबुली चक्क दुकानातील कामगाराने दिली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पुरवठा विभागामार्फत पंचनामा ही करण्यात आला असून इथून मागे असे किती धान्य काळ्या बाजाराने विकले असेल असा प्रश्न आता नागरिक करीत आहे.

खेड तालुक्यातील दावडी येथील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या नावे स्वस्त धान्य दुकान असून प्रत्यक्षात हे दुकान माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना सातपुते यांचे पती माणिक सातपुते हे चालवत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

महिलांना रोजगार मिळावा या हेतूने दिलेलं दुकान अरेवावी करत हे दुकान चालवत आहे ,धान्य घेतल्यावर पावती न देणे , ग्राहकांना अरेरावी करणे ,कुटुंबाला मुबलक असलेले धान्य योग्य न देणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी गावातील नागरिका कित्तेक वर्ष करीत आहेत. मात्र काही अधिकारी यात कोणतीही कारवाई करत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहे.

या दुकानातील कामगार यांच्या घरात ३८ धान्य  भरलेले पोती आढळून आली विशेष म्हणजे हे धान्याची पोती हाच कामगार घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही मध्ये आले आहे. याबाबत चा जबाब ही प्रत्यक्षात या कामगाराने दिला आहे.

दक्षता कमिटी सदस्य संतोष सातपुते यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांना संपर्क केला असता यांनी येण्यासाठी टाळाटाळ करत पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना पाठविले या पंचनाम्यात या कामगारांचा आणि काही नागरिकांचे जबाब घेण्यात आले,

असून या दुकानातील उपलब्ध धान्य आणि वाटप केलेले धान्य यांच्यात तफावत आढळून आल्याचे समोर आले आहे. मात्र तरीही दुकानावर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यातच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.