मुंबई – येथील ग्रांट रोड परिसरातील एका महागड्या हॉटेलवर धाड टाकून मुंबई पोलिसांनी आज ऑनलाईन वैश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत एका महिलेस अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असं की, मुंबईतील ग्रांट रोड या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या परिसरामध्ये एका ऑनलाईन वेबसाईटद्वारे वैश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
‘बॉम्बे एस्कॉर्ट सर्व्हिस’ या नावाने सुरु असलेल्या या वेबसाईटवर संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक देखील देण्यात आला होता. पोलिसांनी या क्रमांकावर संपर्क साधून ‘ग्राहक’ असल्याचे भासवून भेटण्याचे वेळ व ठिकाण निश्चित केले. यानंतर ठरलेल्या वेळेत एक महिला अन्य दोन महिलांसह ठरलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाली. सदर महिला आल्याची माहिती मिळताच वैश्याव्यवसाय चालवणाऱ्या या महिलेस अटक करण्यासाठी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सदर महिलेस बेड्या ठोकल्या. पुढील तपास दक्षिण मुंबई पोलीस करत आहेत.