नवी दिल्ली – जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत 10.92 टक्के वाढ झाली आहे. औषधे, इलेक्ट्रॉनिक्स, आणि इंजिनिअरिंग मालातील निर्यातीचे प्रमाण वाढल्याने ही वाढ नोंदवली गेली आहे.
सोन्या चांदीचे दागिने आणि जवाहिऱ्यांच्या आयातीतही या काळात 6.58 टक्के इतकी वाढ झाली आहे. भारताच्या निर्यातीत डिसेंबर पासून वाढ दिसू लागली आहे. त्याच्या तीन महिने आधी निर्यातीवर मोठाच विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले होते.
करोनाच्या काळातील विपरीत परिणाम निर्यात क्षेत्रावरही दिसून आल्याने या क्षेत्राच्या रिकव्हरीच्या संबंधात चिंता व्यक्त केली जात होती. पण आता हळूहळू जागतिक अर्थकारण रूळावर येत असल्याने भारताच्या निर्यातीलाही चालना मिळू लागल्याचे संकेत यातून मिळत आहेत.