नवी दिल्ली -जुलै महिन्यात निर्यात 49 टक्क्यांनी 35 अब्ज डॉलर झाली. त्याच बरोबर आयात 62 टक्क्यांने वाढून 46 अब्ज डॉलर झाली. त्यामुळे व्यापारातील तुट 11 अब्ज डॉलर झाली आहे.
व्यापार मंत्रालयाने सांगितले की गेल्या 8 महिन्यापासुन निर्यात वाढत आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
वाहतुक सुरळीत होत असल्याने पेट्रोलिएम पदार्थांची आयात वाढत आहे. तर दुसरीकडे सोन्याची आयात वाढत असल्याने एकूण आयात वाढत आहे. ती कमी करण्याची गरज असल्याचे दिसुन येते.