कर परतावा घेऊन निर्यातदार झाले अदृश्‍य!

1,377 निर्यातदारांचा माग काढण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली :- वाणिज्य मंत्रालय व कर विभागाच्या डोळ्यांत धूळ फेकून 1,377 निर्यातदारांनी 1,875 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळवून पोबारा केला असल्याची माहिती समोर आली आहे.

कर परतावा मिळविण्यासाठी या निर्यातदारांनी जे पत्ते दिले होते, त्या पत्त्यावर निर्यातदारांचे नामोनिशान नाही. वाणिज्य मंत्रालय आणि परकीय व्यापार महासंचालनालयाचे या घटनेनंतर धाबे दणाणले आहेत. या निर्यातदारांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, शोध घेतल्यानंतर त्यांचे आयात-निर्यात परवाने रद्द केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यांना आगामी काळात आयात-निर्यातीच्या व्यवहार करता येणार नाहीत.

या 1,377 निर्यातदारांबरोबरच आणखी काही निर्यातदार जोखमीचे आहेत. अशा निर्यातदारांची एकूण संख्या 7,516 इतकी आहे. या सर्व निर्यातदारांना रडारवर घेण्याचा प्रयत्न वाणिज्य मंत्रालय करीत आहे. यासंदर्भात वृत्त माध्यमांनी काही कर विश्‍लेषकांशी चर्चा केली असता, असे सांगण्यात आले की, बऱ्याच निर्यातदारांना या वर्गवारीत टाकण्यात आले आहे. मात्र या निर्यातदारांचे पुरवठादार यासाठी कारणीभूत आहेत. त्यातील काही पुरवठादार जीएसटी वेळेवर भरत नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.