भलतंच! निर्यात केलेल्या पेट्रोलचीच नेपाळमधून भारतात तस्करी

नवी दिल्ली, – देशातील पेट्रोलचे भाव इतके गगनाला भीडले आहेत की निर्यात केलेले पेट्रोल आणि डिझेलची आता तस्करी होत आहे. गेल्या आठवड्यात एक हजार 360 लिटर डिझेल असणारा ट्रक नेपाळमध्ये पकडण्यात आला.

देशांत अनेक ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण अीाशयाई भागात या किमती सर्वोच्च असल्याचे ग्लोबल पेट्रोल प्राईस डॉट कॉमच्या सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळेच देशात त्याची बेकायदा विक्री सुरू आहे. नेपाळला पेट्रोलचा सर्व पुरवठा भारतातून होतो. बांगलादेश आणि श्रीलंकेला पेट्रोलची निर्यात होते.

नेपाळच्या सीमेपासून अवघ्या दोन किमीवरील बिहारमधील अदापूर येथे पंप चालवणाऱ्या रवी भारती यांनी सांगितले की, कररचनेतील फरकामुळे नेपाळमध्ये पेट्रोल खुप स्वस्त आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.

जागतिक बाजारपेठेत क्रुड ऑईलचे भाव वाढल्याने भारतात पेट्रोलचे भाव वाढले आहेत. पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलच्या दराच्या 60 टक्के रकमेत नेपाळमध्ये पेट्रोल मिळते. त्यामूळे दिवसाला यापुर्वी 1800 लिटर पेट्रोलची विक्री होत असे. ती आता 1200 लिटरवर पोहोचली आहे. वाहनचालक आता रस्त्याच्या कडेला पेट्रोल विकणाऱ्यांकडे पेट्रोल भरतात. कारण, त्यांच्याकडे खूप स्वस्त पेट्रोल मिळते. भारत गरजेच्या 85 टक्के पेट्रोल आयात करते.

ज्या देशांशी पेट्रोल खरेदी करण्याचा करार आधिच्या सरकारने केला आहे त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, त्यानंतरही मोदी सरकारवर केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर स्वपक्षीयांकडूनही टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.