नवी दिल्ली – आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात व्हावी याकरिता गेल्या अनेक वर्षापासून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. आता या महिन्यापासून अमेरिकेला आंबा आणि डाळिंबाची निर्यात होऊ शकेल असे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.
आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात होण्याबरोबरच अमेरिकेतून चेरीची आयात केली जाणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी भारत आणि अमेरिकेत दरम्यान व्यापार विषयावर चर्चा झाली. त्यावेळी अमेरिका भारतातील दोन कृषी उत्पादनाची आयात करणार असून भारत अमेरिकेतील दोन कृषी उत्पादनाची आयात करणार आहे.
दोन वर्षापासून भारताची अमेरिकेला होणारी आंब्याची निर्यात थांबली होती. मात्र आता दोन्ही देशांदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्यामुळे ही निर्यात सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.