नवी दिल्ली – देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. पहिल्या लाटेप्रमाणेच करोनाच्या या लाटेमध्ये देखील महाराष्ट्र प्रमुख हॉटस्पॉट ठरला आहे. देशात रुग्णसंख्येचा नव्याने विस्फोट झाल्याने आरोग्यव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रचंड ताण आलाय. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात रुग्णांना बेड व औषधांसाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, करोना विषाणूग्रस्त गंभीर रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशातच आता केंद्र सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचा पार्श्वभूमीवर भारत सरकारने हे इंजेक्शन व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शन व ते बनवण्यासाठी लागणारी सामग्री देशाबाहेर निर्यात करता येणार नाहीये. हा निर्णय देशातील करोना परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत लागू असेल. यामुळे करोना विषाणूच्या गंभीर रुग्णांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
Export of injection Remdesivir and Remdesivir Active Pharmaceutical Ingredients (API) prohibited till the COVID19 situation in the country improves: Government of India pic.twitter.com/KLENjzTNyn
— ANI (@ANI) April 11, 2021
सरकारच्या आदेशामध्ये काय म्हटलंय?
पुढील काही दिवसांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे औषानिर्माण विभाग देशामध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात असून त्याचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे.
तसेच औषधनिर्माण विभागाने या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपल्या वेबसाईटवर आपल्याकडील रेमडेसिवीरचा उपलब्ध साठा व अधिकृत विक्रेते याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचा सल्ला दिलाय. याखेरीज संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना रेमडेसिवीरचा काळाबाजार व साठेबाजी होऊ नये यासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
There is a potential of a further increase in demand for Remdesivir injection in the coming days. Department of Pharmaceuticals has been in contact with domestic manufacturers to ramp up the production of Remdesivir: Government of India
— ANI (@ANI) April 11, 2021