मुंबई – बॉलीवूड किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. दिवाळीत शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला अभिनेत्याने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तेव्हा पासून त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अभिनेत्या जेव्हा पठाण चित्रपटाचा टिझर शेअर केला होता, तेव्हा पासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अश्यातच, पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे. नुकतंच, शाहरुखने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरची अधिकृत तारीख सांगितली आहे.
“तारीख लिहून ठेवा… ‘पठाण’चा ट्रेलर 10 जानेवारी, 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर चर्चेत असताना ट्रेलर 10 तारखेला लाँच केला जाईल. चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 37 सेकंदाचा ट्रेलर असेल. तो अॅक्शन सीक्वेन्स, संगीत आणि हिरोइझमने भरलेला आहे.” असं या पोस्ट मध्ये सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेरसिकांना हा चित्रपट चार भाषांमध्ये पाहता येणार असून, ‘पठाण’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे.