चंद्रपूर – करोना महामारी संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आता बाकी राहिला असल्याने भारतासह जगात सर्वत्रच या लसीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे.
नागरिकांनी आपण होऊन पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी जगातील बहुतेक देशांनी प्रोत्साहन योजनांची घोषणा केली आहे. अनेक देशांमध्ये सरकार आणि काही खाजगी कंपन्या लोकांनी लसीकरण करण्यासाठी पुढे यावे म्हणून योजनांची घोषणा करत आहेत.
लोकांनी कोरोना लस घ्यावी म्हणून अशीच अनोखी शक्कल महाराष्ट्रातील चंद्रपूर महानगरपालिकेने लढवली आहे. येथील प्रशासनाने LED टीव्ही, रेफ्रिजरेटरपासून वॉशिंग मशीनपर्यंत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
येथील नागरिक १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी येतात त्यांना ही बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल, असे महापालिकेने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. लसीकरणासाठी ही अनोखी ऑफर दिली आहे. ही एक प्रकारची लॉटरी असून, लॉटरी प्रणालीद्वारे विजेता घोषित केला जाणार आहे.