एक जण ठार; चार जण गंभीर जखमी
मुंबई : माडलमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. तर या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
Maharashtra: Walls of a chawl at MHB Colony in Malad, Mumbai collapsed earlier this morning, following a cylinder explosion. 4 people injured, 1 dead.
— ANI (@ANI) September 1, 2019
मालवणीमधील एमएचबी कॉनलीत ही घटना घडली असून स्फोटामुळे घराची भिंत कोसळल्याचेही सांगण्यात येत आहे. जखमींना कांदीवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शितल काते, सिद्धेश गोटे, ममता पवार आणि अश्विनी जाधव हे चार जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.