लखनौ – हापूरच्या धौलाना येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून, त्यात आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकिय आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हास्तरीय अधिकारी पोहोचले असून घटनेची पाहणी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुही क्रॅकर्स फॅक्टरीत दुपारी तीन वाजता हा अपघात झाला. सध्या अधिकारी जखमी आणि मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. फटाक्यांच्या मिश्रणात हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असे लिहिले आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात बॉयलरच्या स्फोटातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.”
#UPCM @myogiadityanath ने जनपद हापुड़ स्थित एक फैक्ट्री में ब्वॉयलर फटने की दुर्घटना में हुई जनहानि पर गहरा शोक प्रकट किया है।
मुख्यमंत्री जी ने दिवंगत आत्माओं की शांति की कामना करते हुए शोक संतप्त परिजनों के प्रति संवेदना व्यक्त की है।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) June 4, 2022